www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
सरबजीत सिंग याचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये निधन झालं. लाहोरच्या जिन्ना हॉस्पिटमध्ये उपचारादरम्यान सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला. लाहोरच्या जेलमध्ये कैद्यांनी सरबजीत सिंग यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर २६ एप्रिलपासून जिन्ना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. हल्ल्यात डोक्याला जबर इजा झाल्याने सरबजीत कोमात होते. अखेर मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जिन्ना हॉस्पिटलमध्ये सरबजित सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला.
पाकिस्तानच्या तुरूंगात हेरगिरीच्या आरोपाखाली डांबण्यात आलेल्या भारतीय सरबजीतवर कोट लखपत जेलमध्ये काही कैद्यानी प्राणघातक हल्ला केला होता. जड वस्तूच्या साहाय्याने मारहाण केल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक त्या दिवसापासूनच चिंताजनक होती.
जेलमधील कैद्यांना एका तासासाठी बाहेर काढले असता इतर कैद्यांनी सरबजीत यांच्यावरक जड वस्तूने प्राणघातक हल्ला केला. कैद्यांनी त्याच्या डोक्यावर हल्ला केल्यामुळे सरबजीत गंभीर जखमी झाले होते. ते कोमात असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नसल्याची डॉक्टरांनी माहिती दिली होती.