www.24taas.com, वॉशिंग्टन
येत्या काही तासांत अमेरिकेच्या किनारपट्टी भागात सॅन्डी वादळ धडकणार आहेत. या वादळाचे संकेत म्हणून तुफानी वारे वाहू लागलेत. तर समुद्रही खवळलाय. समुद्रात दैत्यकाय लाटा निर्माण झाल्यात.
वादळाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकी प्रशासनानं कंबर कसली आहे. किनारपट्टी भाग रिकामा करुन घेण्यात आलाय. पूर्वोत्तर भागातील ६००० विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत. एकट्या न्यूयॉर्क शहरातील ३,७०,००० लोकांना हलवण्यात आलं आहे. कोलंबिया, मॅसेच्युसॅट भागांमध्ये ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आलाय. वाहतूकही कालपासून बंद ठेवण्यात आली आहे. वादळाच्या तडाख्यात कमीत कमी जीवित आणि वित्तहानी होईल या दृष्टीकोनातून उपाययोजना सुरु आहेत.
सॅन्डीमुळं काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या राष्टाध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारावर परिणाम झालाय. राष्टाध्यक्षपदासाठी बराक ओबामा आणि मिट रोमनी यांच्यात अटीतटीची लढत होतेय.