हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या बगदादीचा मृत्यू

इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल म्हणजेच बगदादीचा मृत्यू झाला आहे. 'रेडिओ इराण'ने हे वृत्त दिले आहे.  बगदादीच्या मृत्यूमुळे इसिसला मोठा झटका बसणार आहे.

Updated: Apr 27, 2015, 05:36 PM IST
हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या बगदादीचा मृत्यू title=

तेहरान : इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल म्हणजेच बगदादीचा मृत्यू झाला आहे. 'रेडिओ इराण'ने हे वृत्त दिले आहे.  बगदादीच्या मृत्यूमुळे इसिसला मोठा झटका बसणार आहे.

मागील आठवड्यात बगदादी हा गंभीर जखमी झाला असून ते त्याच्या जिवावर बेतू शकते ,असे गार्डियन वृत्तपत्राने म्हटले होते. मार्चमध्ये अमेरिकाकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात तो जखमी झाला होता, आणि त्यामुळे तो मरणासन्न होता.

जखमी झाल्यावर पुन्हा सावरू न शकल्याने इसिसच्या रोजच्या कारवायांवर बगदादीचे नियंत्रण राहिले नव्हते असे सांगण्यात येत होते. बगदादीचा मृत्यू झाल्याचा रेडिओ इराणचा दावा असल्याबद्दल ऑल इंडिया रेडिओने ट्विट केले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.