पोकेमॉनने रेप केल्याची महिलेची पोलिसांत तक्रार

 सध्या पोकेमॉन हा जगभरात चर्चेचा विषय आहे. त्या संदर्भात नवनवीन किस्से तयार होत आहेत. अनेक घटना, दुर्घटना घडत आहे. पण एका महिलेने या पोकेमॉन संदर्भात धक्कादायक आरोप करून चर्चेचा विषय बनली आहे. 

Updated: Aug 12, 2016, 05:39 PM IST
पोकेमॉनने रेप केल्याची महिलेची पोलिसांत तक्रार  title=

मॉस्को :  सध्या पोकेमॉन हा जगभरात चर्चेचा विषय आहे. त्या संदर्भात नवनवीन किस्से तयार होत आहेत. अनेक घटना, दुर्घटना घडत आहे. पण एका महिलेने या पोकेमॉन संदर्भात धक्कादायक आरोप करून चर्चेचा विषय बनली आहे. 

 रशियातील एका महिलेने पोकेमॉनने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. 

या महिलेने याबाबत पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली. या तक्रारीचा तपास कसा करायचा हा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. 

मॉस्कोमध्ये राहणाऱ्या या महिलेने जी तक्रार दिली आहे, त्यात नेमकं काय  घडलं हे महिलेने सांगितले आहे. ती म्हणाली,  रात्री पोकेमॉन गो गेम खेळता-खेळताच माझा डोळा लागला. मात्र, सकाळी जाग आली तेव्हा पोकेमॉनचे कॅरेक्टर चक्क माझ्या बेडवर पाहून मला धक्काच बसला. 

पोकेमॉन माझ्या अंगावर होता आणि त्याने माझ्यावर बलात्कार केला. झटापटीत मी बेडवर खाली कोसळले आणि पोकेमॉन गायब झाला. माझ्या मोबाइलमध्ये असलेलं पोकेमॉन गो अॅप अजूनही पोकेमॉन बेडरूमच्या आसपास असल्याचेच दाखवत आहे.

दरम्यान, महिलेच्या या तक्रारीने मॉस्को पोलीस चक्रावून गेले असून त्यांनी  महिलेला मानपसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.