www.24taas.com, झी मीडिया, लिमा
देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते. अशी काहीशी घटना पेरू एअरफोर्समधील ३१ वर्षीय एमेसिफ्यून गमारा बाबत घडले. एका ट्रेनिंग एक्सरसाइजमध्ये सुमारे ५ हजार फूट उंचावर त्याचे पॅराशूट उघडले नाही तो सरळ जमिनीवर पडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या उंचावरून पडल्यावर तो जीवंत राहिला.
विशेष म्हणजे शरीरातील कोणतेही हाडे तोडले नाहीत. इमरजन्सी रूमच्या डॉक्टरने घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. हे दुसरे तिसरे काही नाही चमत्कार आहे. केवळ देवाची मर्जी होती म्हणून तो वाचला. गमारा याचे हॉस्पिटलमध्ये अनेक चाचण्या झाल्या. पण त्याच्या शरिरावर कोणताही फ्रॅक्चर नाही.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गमारा सुमारे पाच हजार फूट उंचावरून उडी मारली तेव्हा पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा बेल्ट त्याच्या गळ्या भोवती अडकला. तो बेशुद्ध झाला. त्यांनी सांगितले की, आम्हांला खरचं नाही माहिती तो जीवंत करा राहिला. ही घटना चमत्कारापेक्षा काही कमी नाही.
गमारा गेल्या आठ वर्षांपासून एअरफोर्समध्ये काम करीत आहेत. त्याला अनेक चाचण्यांनंतर मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.