www.24taas.com, झी मीडिया, लंडन
जगातील एकूण संपत्तीपैकी निम्मी संपत्ती जगातील ८५ अतिश्रीमंत व्यक्तींकडे आहे. हा दावा केलाय वर्ल्डवाईड डेव्हलेपमेंट ऑर्गनायझेशन ऑक्सफामनं.
दावोस इथं सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेपूर्वी ऑक्सफामचा अहवाल वर्किंग फॉर द फ्यूमध्ये हा दावा करण्यात आलाय. या अहवालानुसार १९७० च्या दशकात श्रीमंतांसाठी आयकराचा दर तीसपैकीं एकोणतीस देशात कमी झालाय. ज्या देशांची आकडेवारी उपलब्ध आहे ते हे देश आहेत.
याचाच अर्थ काही ठिकाणी श्रीमंत भरपूर पैसाच कमवतायत आणि आयकरही कमी देतायत. गेल्या दशकात भारतातही अब्जाधीशांची संख्या वाढल्याचं ऑक्सफामच्य़ा अहवालात म्हटलंय. अब्जाधीशांची ही संख्या दशकभरात दहापटीने वाढल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.