फोर्ब्सच्या यादीत `टीव्ही क्वीन` प्रथम क्रमांकावर!

फोर्ब्सच्या वार्षिक पत्रिकेत लेडी गागा, स्टीव्हन स्पीलबर्ग आणि मॅडोना या सेलिब्रिटींना मागे टाकत ‘टीव्ही क्वीन’ ऑपरा विन्फ्रे हिनं जागा मिळवलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 27, 2013, 11:51 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
फोर्ब्सच्या वार्षिक पत्रिकेत लेडी गागा, स्टीव्हन स्पीलबर्ग आणि मॅडोना या सेलिब्रिटींना मागे टाकत ‘टीव्ही क्वीन’ ऑपरा विन्फ्रे हिनं जागा मिळवलीय.
छोट्या पडद्यावर मोठ-मोठ्या सेलिब्रिटींना दिलखुलासपणे व्यक्त व्हायला भाग पाडणाऱ्या ऑपरा विन्फ्रे हिनं फोर्ब्समध्ये शीर्ष स्थान पटकावलंय. फोर्ब्सनं प्रकाशित केलेली १०० सेलिब्रिटींची ही १४ वी वार्षिक यादी आहे. यामध्ये लेडी गागा, स्टीव्हन स्पीलबर्ग आणि मॅडोना यांना अनुक्रमे दुसरा, तीसरा आणि चौथा क्रमांक मिळालाय.
अरबपती असलेल्या या टीव्ही स्टारनं जून २०१२ ते जून २०१३ पर्यंत ७ करोड ७० लाख अमेरिकन डॉलर कमाई केली असल्याचं बोललं जातंय. यादरम्यान टीव्ही, सोशल मीडिया आणि प्रिंट माध्यमातून सतत झळकत राहण्याचं कसबनं ऑपरानं साधलंय.
५९ वर्षीय ऑपरा विन्फ्रे हिनं यापूर्वी चार वेळा फोर्ब्सच्या यादीत पहिला क्रमांक पटकावलाय.

यादीतील पहिले दहा सेलिब्रिटी आणि त्यांची संपत्ती (२०१३) पुढीलप्रमाणे
1. ऑपरा विन्फ्रे, ७७ मिलियन डॉलर
2. लेडी गागा, ८० मिलियन डॉलर
3. स्टीव्हन स्पीलबर्ग, १०० मिलियन डॉलर
4. बियॉन्स नॉल्स, ५३ मिलियन डॉलर
5. मॅडोना, १२५ मिलियन डॉलर
6. टेलर स्विफ्ट, ५५ मिलियन डॉलर
7. बॉन जोवी, ७९ मिलियन डॉलर
8. रॉजर फेडरर, ७१ मिलियन डॉलर
9. जस्टीन बीबर, ५९ मिलियन डॉलर
10. एलेन डिजेनरस, ५६ मिलियन डॉलर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.