‘ओपीसीडब्ल्यू’ला नोबल शांतता पुरस्कार घोषीत

सर्वांना उत्सुकता लागलेलं यंदाचे शांततेचा नोबेल पुरस्कार ‘ओपीसीडब्ल्यू’ (Organisation for the Prohibition of Chemical Weapons) अर्थात ‘रासायनिक शस्त्रविरोधी संघटने’ला मिळालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 11, 2013, 04:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सर्वांना उत्सुकता लागलेलं यंदाचे शांततेचा नोबेल पुरस्कार ‘ओपीसीडब्ल्यू’ (Organisation for the Prohibition of Chemical Weapons) अर्थात ‘रासायनिक शस्त्रविरोधी संघटने’ला मिळालाय.
‘ओपीसीडब्ल्यू’ ही संघटना जगभरात रासायनिक शस्त्रांच्या वापराच्या विरोधात विचारांचा प्रचार आणि प्रसार करते. गेल्या काही वर्षांत जगभरातल्या अनेक देशांमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं अनेक शस्त्रांस्त्रांसह रासायनिक शस्त्र वापरण्य़ाचाही धोका बळावलाय. या शस्त्रांमुळं मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होते. त्यामुळं या शस्त्रांच्याविरोधात जनजागृती पसरवण्याची मोलाची कामगिरी ‘ओपीसीडब्ल्यू’ या संघटनेनं बजावलीय.

काय आहे ‘ओपीसीडब्ल्यू’...
• ‘ओपीसीडब्ल्यू’ या संघटनेची स्थापना २८ एप्रिल १९९७ मध्ये झाली असून मुख्यालय नेदरलँडच्या हेगमध्ये
• जगभरातील तब्बल १९० देश या संघटनेचे सदस्य असून केवळ सहा देश सदस्य नाहीत
• या संघटनेत ५०० कर्मचारी कार्यरत असून जगभरातील रासायनिक शस्त्रविरोधात प्रचार आणि प्रसार करतात
• रासायनिक शस्त्र नष्ट करणे, उत्पादन रोखण्याबाबत पावले उचलत असते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.