कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील किंगडम मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. या हॉस्पिटलमध्ये एका महिलेने पाच मुलांना जन्म दिला आहे.
२६ वर्षीय किम तुकी या महिलेच्या पाच बालकांपैकी एक मुलगा आणि चार मुली आहेत. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. यापूर्वी असे कधीच झाले नाही. एका महिलेने पाच मुलांना जन्म देण्याची ही पहिली वेळ आहे.
सध्या आई आणि सर्व बालकांची प्रकृती व्यवस्थित आहे. महिला गर्भावस्थेत असताना तिला प्रतिदिनी ६ हजार कॅलरीचे जेवण द्यावे लागत होते. हॉस्पिटलची टीम किम आणि तिच्या मुलांची काळजी घेत आहे.