उत्तर कोरियाने डागले रॉकेट

उत्तर कोरियाने रविवारी लांब पल्ल्याच्या रॉकेटचे प्रक्षेपण केले. कोरियाने हे रॉकेट डागून प्रतिबंधित क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची टीका विरोधकांनी केलीय. 

Updated: Feb 7, 2016, 08:11 AM IST
 उत्तर कोरियाने डागले रॉकेट title=

सेउल : उत्तर कोरियाने रविवारी लांब पल्ल्याच्या रॉकेटचे प्रक्षेपण केले. कोरियाने हे रॉकेट डागून प्रतिबंधित क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची टीका विरोधकांनी केलीय. 

हे क्षेपणास्त्र उत्तर पश्चिमी तळावरुन सोडण्यात आल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. हे जपानच्या दक्षिण ओकिनावा द्वीप येथून गेले. 

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी हे संयुक्त राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. याआधी उत्तर कोरियाने पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह प्रस्थापित करणार असल्याचे सांगितले होते.