लिलावात बापूंच्या रक्तापेक्षा वारसापत्राचाच बोलबाला!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रार्थनेची माळ, रक्ताचा नमूना, चमड्याची चप्पल, शेवटचं वारसापत्र तसंच शपथपत्रांसहीत त्यांच्या वैयक्तिक सामनाचा लिलाव मंगळवारी ब्रिटनमध्ये पार पडला

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 22, 2013, 11:50 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रार्थनेची माळ, रक्ताचा नमूना, चमड्याची चप्पल, शेवटचं वारसापत्र तसंच शपथपत्रांसहीत त्यांच्या वैयक्तिक सामनाचा लिलाव मंगळवारी ब्रिटनमध्ये पार पडला.
ब्रिटनच्या श्रॉपशायर या छोट्या शहरातील लुडलो रेसकोर्समध्ये महात्मा गांधीजींच्या दुर्लभ वस्तुंची आणि दस्तावेजांचा लिलाव झाला. तीन लाख पाऊंडपेक्षा जास्त रक्कम (अडीच करोड रुपये) या लिलावाद्वारे उभारण्यात आलीय. यामध्ये गांधींजींनी केलेल्या वारसापत्रावर खरेदीदारांचं लक्ष होतं. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, या लिलावामध्ये मांडण्यात आलेल्या बापूंच्या रक्ताच्या नमून्याकडे मात्र खरेदीदारांनी पाठ फिरवली होती.

महात्मा गांधींनी आपल्या हातानं आपल्या मुलासाठी लिहिलेलं दोन पानांचं वारसापत्र ‘महत्त्वाचा दस्तावेज’ म्हणून मानलं गेलं. ३०,००० पाऊंड अशी किंमत वारसापत्राला मिळू शकते असा अंदाजा बांधला जात होता. परंतू प्रत्यक्षात जेव्हा याचा लिलाव झाला तेव्हा याची किंमत ५५,००० पाऊंडवर (४६ लाख रुपये) पोहचली होती. वारसापत्राव्यतिरिक्त एक मायक्रोस्कोपिक स्लाइडवर बापूंच्या रक्ताच्या नमून्याला खरेदीदारांची पसंती मिळेल, लिलावत १०,००० पाऊंडपर्यंत किंमत जाईल, असा अंदाजा लावण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात या रक्ताच्या नमून्यासाठी जास्तीत जास्त बोली लागली ती केवळ ७,००० पाऊंडची (सहा लाख रुपये).
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.