९ वर्षाची मुलगी प्रकाशित करते न्यूज पेपर

अमेरिकेतील पेन्सिलवेनियामध्ये हिल्दे केट लिसियाक न्यूजपेपर प्रकाशित करते. ती फक्त ९ वर्षांची आहे. हिल्दे आपल्या बातम्या घटनास्थळी जाऊन मिळवते. 

Updated: Apr 10, 2016, 11:09 PM IST
९ वर्षाची मुलगी प्रकाशित करते न्यूज पेपर title=

पेन्सिलवेनिया : अमेरिकेतील पेन्सिलवेनियामध्ये हिल्दे केट लिसियाक न्यूजपेपर प्रकाशित करते. ती फक्त ९ वर्षांची आहे. हिल्दे आपल्या बातम्या घटनास्थळी जाऊन मिळवते. 

हिल्दे ने एका घटनास्थळी जाऊन हत्या प्रकरणाचा रिपोर्ट तयार केला, फोटो व्हि़डीओ घेतला, पोलिसांकडून माहिती मिळवली आणि आपल्या सोशल मीडिया पेजवर आणि वेबसाईटवर ते प्रकाशित केलं. ती घटनास्थळी पोहोचली तेव्हा इतर पत्रकार नव्हते. पोलीसही तीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतात.

हिल्देला सर्व काम स्वत: करायला आवडतं, तिला इतरांची मदत घेणे आवडत नाही. हिल्दे अमेरिकेत लोकप्रिय झाली आहे. जगभरातील मोठ मोठे न्यूज पेपर्स तिची मुलाखत छापत आहेत. ते एक छोटं न्यूज पेपर देखील चालवते. ऑरेंज स्ट्रीट न्यूज असं तिच्या न्यूज पेपरचं नावं आहे.