www.24taas.com , झी मीडिया,लंडन
अल कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने नवा आदेश काढला आहे. हिंदूंची हत्या करू नका, असे म्हटले आहे. मुस्लिमांच्या भूमीवर हिंदूंची हत्या करू नका, असे या आदेशात अल कायदाच्या मोरक्याने म्हटले आहे.
अमेरिकेवर करण्यात आलेल्या हल्ल्याला १२ वर्षे झाल्यानिमित्त अल कायदा या संघटनेच्या कार्याचा आढावा जवाहिरीने घेतला. यावेळी हा आदेश दिला आहे. जिहादींनी अमेरिका आणि इस्राईलला कमजोर करण्यासाठी कामाला लागले पाहिजे. या दोन्ही देशांना कमजोर करणे हा आपला प्रमुख उद्देश आहे; परंतु लढण्याची पद्धत बदलायला पाहिजे, असे अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याने आदेश देताना म्हटले आहे.
जिहादींनी काश्मीयरसाठी लढावे, मात्र मुस्लिमांच्या भूमीवर हिंदूंची हत्या करू नका, अले जवाहिरीने जिहाद फोरमवर नवे आदेश जारी केले. आपल्याला मशिदींवर करण्यात येणारे हल्ले थांबवावे लागतील. तेथे निष्पाप महिला-मुलांचा मृत्यू होऊ शकतो. तर मुस्लिमांच्या विविध पंथांमध्ये होणारा हिंसाचारही थांबवला पाहिजे. शिया व सुन्नी पंथीयांनी आपापसांतील वाद थांबविले पाहिजेत.
दरम्यान, मुस्लिम दहशतवादाविरुद्ध कारवाई करणाऱ्या अल्जिरियाला नामोहरम करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. पश्चिकम आफ्रिकेमध्ये जिहादींचा प्रभाव वाढविला पाहिजे, असेही त्याने म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.