VIDEO : पाण्यावर चालते ही बाईक, एक लीटरमध्ये 500 किमी

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका पौढाने चक्क पाण्यावर चालवणारी बाईक तयार केली आहे. १ लीटर पाण्यावर ही बाईक ५०० किमी मायलेज देते.

Reuters | Updated: Aug 7, 2015, 09:44 PM IST
VIDEO : पाण्यावर चालते ही बाईक, एक लीटरमध्ये 500 किमी title=

साओ पावलो, ब्राझील : ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका पौढाने चक्क पाण्यावर चालवणारी बाईक तयार केली आहे. १ लीटर पाण्यावर ही बाईक ५०० किमी मायलेज देते.

रिकार्डो एजवेडो असे या पौढाचे नाव आहे. त्यांने पाण्यावर धावणाऱ्या बाईकचे नाव 'टी पॉवर एच2ओ' ठेवले आहे. रिकार्डो यांने आपल्या बाईकची चाचणीही घेतली. तसेच स्थानिक वितरक त्याच्या संपर्कात आहेत.

रिकोर्डो यांनी एक व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केलाय. पाण्यावर ही बाईक चालते याचे प्रात्यक्षिकही करुन दाखविले आहे. पाण्यात काहीही मिसळलेली नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न पाणी पिऊन केलाय. या  बाईकला एक बॅटरीही बसविली आहे. बॅटरीच्या माध्यमातून पाण्यापासून हायड्रोजन तयार होतो. तो पाण्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे मिश्रण होते. यामुळे पाण्यापासून मिळालेल्या हायड्रोजनवर बाईक चालते, असा त्याचा दावा आहे. ही बाईक मूळ इंजिनावरच धावते.

पाहा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.