...जेव्हा आईनं ऐकले मृत बाळाच्या हृदयाचे ठोके!

होय, एका आईनं आपल्या बाळाच्या मृत्यूनंतरही त्याच्या हृदयाचे ठोके ऐकलेत... आणि ही काही कल्पोकल्पित घटना नाही तर खरी घटना आहे. 

Updated: Feb 3, 2016, 05:36 PM IST
...जेव्हा आईनं ऐकले मृत बाळाच्या हृदयाचे ठोके! title=

एरिझोना : होय, एका आईनं आपल्या बाळाच्या मृत्यूनंतरही त्याच्या हृदयाचे ठोके ऐकलेत... आणि ही काही कल्पोकल्पित घटना नाही तर खरी घटना आहे. 

एरिझोनामध्ये ही घटना घडलीय. ४ वर्षांपूर्वी लुकास नावाच्या एका सात महिन्यांच्या बाळाची हत्या करण्यात आली होती. मृत्यूपूर्वी हे बाळ निपचित अवस्थेत काही दिवस हॉस्पीटलमध्ये भर्ती होतं. याच दरम्यान त्याच्या आईनं - हेदर क्लार्क हिनं - आपल्या बाळाच्या अवयव दानाचा निर्णय घेतला.

आपलं बाळ या निमित्तानं तरी जिवंत राहू शकेल, अशी तिची पक्की खात्री होती. आता, या बाळाचं दान करण्यात आलेलं हृदय एका १८ महिन्यांच्या जोर्डन या मुलीच्या शरीरात धडकतंय. ही मुलगी आज सुखरुप श्वास घेतेय. नुकतीच ही मुलगी या महिलेला भेटण्यासाठी आली तेव्हा या आईचा आपल्या भावनांवर ताबा राहिला नाही आणि तिनं आपल्या अश्रुंना वाट मोकळी करू दिली.  

हेदर क्लार्क हिच्या बॉयफ्रेंडनं लुकासचा जीव घेतला होता. जोर्डनच्या छातीवर डोकं ठेवून हेदर हिला आपलं बाळ अजूनही जिवंत असल्याचं वाटतंय.