www.24taas.com, झी मीडिया, कुआलल्मपूर
चीन सरकारच्या वेबसाईटवर मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमानाचे काही सॅटेलाईट फोटो जाहीर करण्यात आलेत. याच ठिकाणावर हे विमान कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या तीन फोटोंमध्ये दक्षिण चीनी सागरात तीन मोठ्या मोठ्या वस्तू तरंगताना दिसत आहेत.
बिजिंगला जाणारं हे विमान गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता आहे. यामध्ये तब्बल २३९ प्रवासी प्रवास करत होते. कुआलालंपूरहून उड्डाण घेतलेल्या या विमानाचा एक तासाच्या आताच संपर्क तुटला होता. विमानातून कोणत्याही प्रकारचा सिग्नल किंवा संदेश मिळाला नव्हता.
`फ्लाईट एम एच ३७०` कुआलालंपूरहून बीजिंगच्या रस्त्यावर दक्षिण चीन सागराच्या मध्यावरच भरकटलं होतं. या विमानात चीनी नागरिकांची संख्या जास्त आहे. चीननं प्रवाशांच्या नातेवाईकांच्या दबावामुळे मलेशियावर शोधमोहिमेसाठी दबाव आणण्याचा आणि शोधकामाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केलाय.
या शोध मोहिमेसाठी तब्बल दहा देशांचे ३४ विमानं आणि ४० जहाजं या सर्च ऑपरेशन्समध्ये सहभागी झालेत.
११,००० मीटर उंचीवरून अचानक विमान कसं बेपत्ता झालं? यावर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलंय. विशेषज्ञांच्या मते, विमान ११ किलोमीटर उंचीवरच तुटलं असावं आणि त्याचा भाग उंचावरूनच वेगवेगळ्या दिशांना फेकले गेले असावेत. तर काहिंच्या मते, हे विमान रबराच्या झाडांच्या दाट जंगलात कोसळलं असावं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.