१०० वर्षांची कोट्यधीश भिकारी महिला!

भिकारी म्हटलं की, अत्यंत द्रारिद्रयाची भावना मनात येते. मात्र सौदी अरेबिया शहरातील जेद्दाहमध्ये एक भिकारी महिला कोट्याधीश असल्याचं उघडकीस आलंय.

Updated: Mar 21, 2014, 04:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सौदी अरेबिया
भिकारी म्हटलं की, अत्यंत द्रारिद्रयाची भावना मनात येते. मात्र सौदी अरेबिया शहरातील जेद्दाहमध्ये एक भिकारी महिला कोट्याधीश असल्याचं उघडकीस आलंय.
वयाची शंभरावी गाठणाऱ्या आयशा या भिकारी महिलेचं नुकतंच तिच्या राहत्या घरी निधन झालं. तिच्या मृत्यूनंतर तिच्याकडे सहा कोटींची मालमत्ता सापडलीय. या मालमत्तेमध्ये सोन्याची नाणी, दागिने आणि काही स्थावर मालमत्ता आहे. विशेष म्हणजे, ही भिकारी महिला अंधही होती... तसेच ती जेद्दाह शहरात गेल्या ५० वर्षांपासून भीक मागत होती.
जेद्दाहमधल्या अल-बलाड या भागात तिची चार घरंही असल्याचं आढळून आलंय. या घरांची किंमत जवळपास ४ कोटी रुपयांच्या घरात आहे. तसेच तिच्याकडे दोन कोटी रुपयांचे दागिने आणि सोन्याची नाणीही सापडली. आयशासोबत भीक मागणाऱ्या अहमद-अल-सईदी यांच्या म्हणण्यानुसार, तिला आई आणि बहिणीशिवाय कोणीही नातेवाईक नव्हतं. आई आणि बहीण यांच्या मृत्यूनंतर आयशाला ही मालमत्ता मिळाली होती. त्यानंतर, कोट्यधीश झालेल्या आयशाला भीक मागणं सोडून देण्याचा सल्ला अनेकांनी दिला होता. मात्र, आपण कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी जमा करत असल्याचं सांगत तीनं आपलं काम सुरूच ठेवलं.
मृत्यूपूर्वी आयशा आजींनी आपलं मृत्यूपत्रंही बनवलंय. यामध्ये, आपली संपूर्ण मालमत्ता गरीबांमध्ये वाटली जावी, असं म्हटलं गेलंय. आयशाने तिच्या घरात राहणाऱ्यांकडून कधीही भाडे मागितलं नाही. त्यामुळे आयशा सध्या चर्चेचा विषय बनलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.