मंडेला भोगत आहेत पूर्वजांचा `अभिशाप`!

दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या घराण्याला पुर्वजांनी दिलेल्या शापामुळे आजारपणाशी सामना करवा लागत आहे आणि त्यांची मनःशांती भंग होण्यामागेही हाच शाप कारणीभूत असल्याची आफ्रिकन मान्यता आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 2, 2013, 03:33 PM IST

www.24taas.com, प्रीटोरिया
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या घराण्याला पूर्वजांनी दिलेल्या शापामुळे आजारपणाशी सामना करवा लागत आहे आणि त्यांची मनःशांती भंग होण्यामागेही हाच शाप कारणीभूत असल्याची आफ्रिकन मान्यता आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष मंडेला यांच्या घराण्यातील ज्येष्ठांचं आणि प्रमुखांच्या मते मंडेलांच्या दीर्घ आजारांमागचं कारण पूर्वजांचा शाप हेच आहे. मंडेलांच्या नातवाच्या तीन मुलांचं – मॅकगॅथो, थेम्बेकाइल आणि नऊ महिन्यातच मेलेली मुलगी मकाजिवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवशेष क्यूनू येथून मवेजो येथे दफन करणं आवश्यक आहेत. ते दफन न केल्यामुळे घराण्याला पूर्वजांचा शाप लागल्याचं मानण्यात येत आहे.
या संदर्भात मथाटा हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आला. घराण्यातील मृतांचे अवशेष क्यूनू मधून मवेजो येथे आणून दफन करण्यासंदर्भात घरातील १७ सदस्यांनी अर्ज केला होता. हायकोर्टाने याबद्दल मंजुरी दिली आहे. सध्या ९४ वर्षी मंडेला प्रीटोरिया येथील एका हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असली, तरी सध्या स्थिर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.