www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंग/क्वालालंपूर
हिंदी महासागरतील सुदूर दक्षिण भागात चीनच्या उपग्रहांना एका मोठ्या वस्तूचा शोध लागलाय. ही मोठी वस्तू म्हणजे मलेशियातील बेपत्ता विमानाचा मलबा असू शकतो. विमान तपासाचा आजचा तिसरा आठवडा सुरू आहे.
मलेशियाचे संरक्षण आणि वाहतूक मंत्री हिशामुद्दीन हुसेन यांनी कुआलालंपूरमध्ये माहिती देतांना सांगितलं की, ही वस्तू २२.५ मीटर लांब आणि १३ मीटर जाडीची आहे. आता चीननं त्या वस्तुची तपासणी करण्यासाठी जहाज पाठवलेत. उपग्रहाद्वारे मिळालेल्या फोटोंवरून ही स्पष्ट होतंय की, ही वस्तू पाण्यावर तरंगतेय. मंगळवार १८ मार्चला दुपारी १२च्या सुमारास ही वस्तू समुद्रात दिसली.
ऑस्ट्रेलियाच्या सुदूर पश्चिम समुद्रात १६ मार्च इतर उपग्रहांनी बघितलेल्या मलब्यापासून १२० किलोमीटर दक्षिण - पश्चिम समुद्रात ही वस्तू दिसलीय. चीनच्या गाओफेन उपग्रहानं हा फोटो घेतलाय.
८ मार्चला बीजिंगला जाणारं एमएच- ३७० हे विमान अचानक बेपत्ता झालं होतं. या विमानात एकूण २३९ प्रवासी होते. त्यात पाच भारतीय आणि एक भारतीय वंशाचा कॅनडियन प्रवासी होता. चीनच्या उपग्रहांनी घेतलेला हा दुसरा फोटो आहे. आता विमान शोधण्यासाठी सहा विमान, ज्यात दोन खाजगी विमानांचा समावेश आहेत ते शोध घेत आहेत. ऑस्ट्रेलियातील विमान काहीच हाती न लागल्यानं परतले होते. तर चीन, जापान आणि ब्रिटनचे जहाज या शोधकार्यात सहभागी होणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.