कॅनडाच्या संसदेत भाषण देणार मलाला

कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफजई तिथल्या संसदेत भाषण करणार आहे. याच कार्यक्रमात तिला कॅनडाचं मानद नागरिकत्व प्रदान केलं जाईल.

Intern - | Updated: Apr 4, 2017, 06:34 PM IST
 कॅनडाच्या संसदेत भाषण देणार मलाला  title=

मुंबई : कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफजई तिथल्या संसदेत भाषण करणार आहे. याच कार्यक्रमात तिला कॅनडाचं मानद नागरिकत्व प्रदान केलं जाईल.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो पुढे म्हणाले की,' या संसदेत भाषण देणारी मलाला ही सर्वात लहान व्यक्ती असेल. ती इथे शिक्षण आणि मुलींचं सक्षमीकरण यावर चर्चा करेल'. ही पाकिस्तानी समाजप्रबोधक 12 एप्रिलला तिकडे पोहचेल. 

पाकिस्तानात 2014 साली महिला शिक्षणाची बाजू उचलून धरल्याने तिला शाळेतून परतत असताना अतिरेक्यांनी गोळी मारली होती. काही उपचार तिथेच केल्यानंतर अवघ्या पंधरा वर्षाच्या तिला ब्रिटनला आणले गेले.

तिच्या कामाचं जगभरातून कौतुक झालं आणि तिला खुप शुभेच्छा मिळाल्या. त्याच वर्षाचं शांततेचं नोबेल पारितोषिक प्रदान करून तिला गौरविण्यात आलं होतं.