पॅरीस : फ्रान्सच्या नव्या अध्यक्षांची पत्नीही तितकीच ग्लॅमरस आहे.. मॅक्रोन यांची प्रेमकहाणी..
ब्रिगेट मॅक्रॉन...वय चौसष्ट...या आहेत फ्रान्सच्या फर्स्ट लेडी...पुढच्या वीकेंडला इमॅन्युअल मॅक्रोन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील, तेव्हा 64 वर्षांच्या ब्रिगेट त्यांच्यासोबत असतील...फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन अवघ्या 39 वर्षाचे आणि त्यांच्या पत्नी 64 वर्षाच्या...दोघांमध्ये तब्बल 24 वर्षांचं अंतर आहे...पण गुळपीठ असलं भारी जमलंय....की क्या कहना..
ब्रिगेट मॅक्रॉन पूर्वाश्रमीच्या शिक्षिका आहेत.. ड्रामा टीचर म्हणून त्या इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या आयुष्यात आल्या...तेव्हा इमॅन्युअल अवघा 15 वर्षाचा होता...ब्रिगेट त्यावेळी चाळीशीत होत्या...तीन मुलं आणि आपल्या पतीसोबत सुखाचं जीवन जगत होत्या...पण आपल्या ड्रामा टीचरवर लट्टू झालेल्या इमॅन्युअलनं ब्रिगेटचा ध्यास घेतला.
पुढं मॅक्रॉन यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला. इन्वेस्टमेंट बँकर म्हणून आपलं करिअर सुरू केलं...फ्रान्समधल्या एकूण जीवनशैलीला साजेशीच ही लव्हस्टोरी असल्यानं त्याबद्दल फारसा बोभाटा झाला नाही... अखेर अनेक वर्ष प्रेमात बुडालेल्या या जोडप्यानं 2007मध्ये लग्न केलं.
ब्रिगेट मॅक्रॉन यांना पहिल्या पतीपासून तीन मुलं आहेत...एकीचं लग्न झालंय, त्यांना नातही आहे.. गेले सहा महिने इमॅन्युअल मॅक्रॉन यांना ब्रिगेटनी सावलीसारखी साथ दिलीय. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर ब्रिगेट-इमॅन्युअलची जोडी सर्वाच्या चर्चेचा विषय होती...आजही आहे.
फ्रेन्ड फिलॉसफर आणि गाईड या तिन्ही रोलमध्ये ब्रिगेट अगदी फिट बसतात...इमॅन्युअलाही मॅक्रॉन यांनाही त्याची जाणीव आहे.
मॅक्रॉन यांचं मन कलाकराचं आहे.. ते स्वतः एक उत्तम पियानिस्ट आहेत..आपल्याकडे पत्नीपेक्षा पतीचं वय कमी असल्याची उदाहरणं विरळच असतात... त्यातही पतीपेक्षा पत्नी जवळपास वीस-पंचवीस वर्षं मोठी, अशी जोडपी तर शोधावीच लागतील.. पण फ्रेंच जनतेला हे नवं नाही.
एकोणीसशे साठ - सत्तरच्या दशकात फ्रेंच जीवनशैलीत अमूलाग्र बदल झाले. स्त्री-पुरुष संबंधांची सारी सामाजिक बंधनं झुगारण्यात आली. त्याच पिढीचे शिलेदार इमॅन्युअल आणि ब्रिगेट मॅक्रोन आज फ्रेंच राजकारणाच्या शिखरावर आहेत..म्हणूनच त्यांची ही चिनी कम स्टोरी सर्वांनाच भावणारी ठरते आहे.