सेंट लुईस : 'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीला ७.२० कोटी डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. अलाबामा येथील एका ६२ वर्षीय महिलेचा बीजांडांच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला.
दरम्यान, कंपनी या निर्णयाला आव्हान देण्याचा विचार करीत असल्याचे, कंपनीच्या प्रवक्त्या कॅरोल गुडरिच यांनी सांगितले आहे. मिसुरी येथील न्यायालयाने 'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीला ७.२० कोटी डॉलरचा दंड ठोठावला. या कंपनीची उत्पादने वापरत असल्याने आपण या रोगाचे बळी ठरल्याचा दावा या महिलेने कोर्टात केला होता.
'आपण रोज उठल्यानंतर ज्याप्रमाणे दात घासतो, तितक्या निष्ठेने आपल्या आईने जॉन्सन कंपनीची उत्पादने अनेक दशके वापरली होती, असे फॉक्स यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर कोर्टाने कंपनीला ७.२० कोटी डॉरलचा दंड ठोठावला.