मुंबई : हवाई हल्ल्यात आयसिस या संघटनेचा नंबर दोनचा म्होरक्या अबू मोहम्मद अल अदनानीचा खात्मा झाला आहे.
अल्बाब भागात झालेल्या हवाई हल्ल्यात ३० ऑगस्टला त्याचा खात्मा झाला. आयसिस संघटनेनं याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं होतं. मात्र, अमेरिकेनं आज त्यांच्या मृत्यूबाबत अधिकृत दुजोरा दिला आहे.
अल अदनानी सुरुवातीपासूनच अमेरिकेचा कट्टर विरोधक होता. तो सीरियात राहत होता.
पॅरिस, ब्राझिलसह बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कट अदनानीनं रचला होता. बगदादीनंतर तो आयसिस संघटनेचा प्रमुख समजला जात होता.