मुंबई : इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याने आपल्या आईची गोळी घालून हत्या केली आहे. सिरियातील रक्का शहरात ही घटना घडली. आयसीस ही दहशतवागदी संघटना सोड, आपण हे शहर सोडू या, हे आपल्या धर्माला, मानवतेला मान्य नाही, असा आग्रह या आईने आपल्या मुलाकडे धरला, ही बाब त्याने आपल्या कमांडरला सांगितली, त्याने या युवकाला आपल्या आईची हत्या करण्याचे आदेश दिले.
धर्माची योग्य आणि मानवतेची शिकवण देणाऱ्या आईवर या दहशतवाद्यांनी धर्मत्यागाचा ठपका ठेऊन ठार मारले. आयसीस विरोधात बोलणे म्हणजे धर्मत्याग हे मोजमाप लावले.
इसिसच्या अली साकर अल कासेम या अतिरेक्यांने आपल्याच आईवर धर्मत्यागाचा आरोप करीत सर्वांसमक्ष डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली.
४५ वर्षीय लेना अल कासेम यांच्यावर इसिसने धर्मत्यागाचा आरोप ठेवला होता. लेना अल कासेम यांनी अलीकडे इसिस सोडण्याचा आग्रह धरला होता. मात्र लेना यांचा मुलगा अलीने सर्वांसमक्ष आपल्या आईच्या डोक्यात गोळी घालून तिची हत्या केली. सिरियातील रक्का शहरात ही घटना घडली. लंडनमधील इंडिपेंडट या वर्तमानपत्राने हे वृत्त दिले आहे.