'सेक्स स्लेव्ह' बनण्यास दिला नकार, १९ मुलींना जिवंत जाळलं

इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांनी सेक्स स्लेव्ह बनण्यास नकार दिल्यानंतर १९ मुलींनी जिवंत जाळल्याची घटना घडलीय. 

Updated: Jun 9, 2016, 01:12 PM IST
'सेक्स स्लेव्ह' बनण्यास दिला नकार, १९ मुलींना जिवंत जाळलं title=

मोसुल : इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांनी सेक्स स्लेव्ह बनण्यास नकार दिल्यानंतर १९ मुलींनी जिवंत जाळल्याची घटना घडलीय. 

न्यूज एजन्सी 'एआरए'नं दिलेल्या माहितीनुसार, यजिदी समुदायाशी संबंधित या तरुणी दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या होत्या. दशतवाद्यांच्या विकृत लैंगिक गरजा भागवण्यास नकार दिल्यानंतर या मुलींना एका पिंजऱ्यात बंद करण्यात आलं.... आणि त्यांना पेटवून देण्यात आलं. मीडिया अॅक्टिव्हिस्ट अब्दुल्लाह अल-माल्ला यांनी ही माहिती दिलीय. 

गुरुवारी ही घटना घडली. यावेळी, अनेक प्रत्यक्षदर्शी ही घटना पाहत होते. एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा १९ मुली पेटवण्यात आल्या तेव्हा शेकडो लोक ही घटना पाहत होते. परंतु, त्यांना वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. 

ऑगस्ट २०१४ मध्ये उत्तर पश्चिम इराकच्या सिंजर भागातून आयएस जिहाद्यांनी जवळपास ३००० यजिदी समुदायाच्या मुलींचं अपहरण केलं होतं. कुर्दिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इराक आणि सीरियामधून अपहरण करण्यात आलेल्या १८०० महिला अजूनही आयएसच्या तावडीत आहेत.