सीसीटीव्ही फुटेज : बंदूक दाखवणाऱ्याला 'ती'नं धू-धू धुतलं!

अमेरिकेत राहणाऱ्या एका मूळ भारतीन महिलेचं सर्व ठिकाणी कौतुक होतंय. आपल्या दुकानात चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका तरुणाशी न घाबरता या महिलेनं दोन हात केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. 

Updated: Mar 5, 2016, 11:31 AM IST
सीसीटीव्ही फुटेज : बंदूक दाखवणाऱ्याला 'ती'नं धू-धू धुतलं! title=

नवी दिल्ली : अमेरिकेत राहणाऱ्या एका मूळ भारतीन महिलेचं सर्व ठिकाणी कौतुक होतंय. आपल्या दुकानात चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका तरुणाशी न घाबरता या महिलेनं दोन हात केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. 

१७ वर्षांचा क्रिस्टियन डकोटा सोडा खरेदी करण्याच्या बहाण्यानं दुकानात दाखल झाला. पण, समोर केवळ एक महिला आहे हे पाहून त्यानं बंदुकीच्या जोरावर तिच्याकडून कॅश काऊंटरवरील पैसे काढण्याचा प्रयत्न केला.. 

पहिल्यांदा ही महिला बंदुकीला घाबरली पण तात्काळ स्वत:ला सावरत तिनं या तरुणावर प्रतिहल्ला केला. हे पाहून हादरलेल्या क्रिस्टियनला तिथून पळ काढावा लागला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या महिलेचं नाव भूमिका पटेल असं आहे.