वॉशिंग्टन : भारतातील १०० मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेतील ३५ राज्यांमध्ये विविध क्षेत्रात १५ अरब अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करून 91 हजारांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
भारतीय कंपन्यांनी सर्वाधीक ३ अरब ८४ कोटी डॉलर एवढी गुंतवणूक केली आहे. तर पेनसिल्व्हेनियामध्ये ३ अरब५६ कोटी डॉलर गुंतवले आहे अशी माहिती भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि ग्रांट थोर्नटोन (जीटी) च्या 'इंडियन रुट्स, अमेरिकन सॉइल' अहवालात दिली आहे.
कॅपिटल हिलमध्ये काल हा अहवाल सिनेटचे सदस्य जॉन कारनिन आणि मार्क वॉर्नर बरोबर २० खासदार उपस्थित होते.
अमेरिकेत वाढणाऱ्या विदेशी गुंतवणूकीत भारत हा चौथ्या क्रमांकाचा देश बनण्याच्या तयारीत आहे. असे सिनेटचे इंडिया कॉकसचे सह अध्यक्ष वॉर्नर यांनी सांगितले आहे.
अहवालामुसार भारतीय कंपन्यांनी न्यू जर्सीमध्ये 9300, कॅलिफोर्नियामध्ये 8400, टेक्सासमध्ये 6200, न्यूयॉर्कमध्ये 4100 रोजगार उपलब्ध करून दिले आहेत.
रोजगार उपलब्ध करून देण्यात भारतीय कंपन्या पहिल्या पाच स्थानावर आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.