शांघाय: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस... आज मोदींनी शांघाईमध्ये झालेल्या इंडिया-चायना बिझनेस फोरमला उपस्थिती लावली. यावेळी पंतप्रधानांनी चीनी गुंतवणूकदारांना भारतामध्ये गुंतवणुकीचं आवाहन केलं.
चीनी उद्योगांतील महत्त्वाच्या कंपन्यांच्या सीईओंची यावेळी त्यांनी भेट घेतली. दरम्यान दोन्ही देशांतील कंपन्यांमध्ये २२ अब्ज अमेरिकी डॉलर्स किमतीच्या २१ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मोदींच्या चीन दौऱ्याची सांगता झाली ती शांघाईमधील फुदान युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनने..
चीन मधील भारतीय वंशाच्या नागरीकांनी पंतप्रधान मोदींसाठी फुदान युनिव्हर्सिटीमध्ये भव्य रिसेप्शन आयोत केलं. सुंदर सांस्कृतीक कार्यक्रमानं या रिसेप्शनला सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ हजार भारतीयांशी मुक्त संवाद साधला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.