अखेर संशोधनाचं मिळालं 8 लाख डॉलर फळ!

भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला संशोधनासाठी वृद्धापकाळी येणाऱ्या बहिरेपणावर उपचार करण्यासाठी आवश्ययक असणाऱ्या, भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाला तब्बल आठ लाख ६६ हजार ९०२ अमेरिकन डॉलरचा निधी घोषित करण्यात आला आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 8, 2014, 01:33 PM IST

www.24taas.com, पीटीआय, ह्यूस्टन
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला संशोधनासाठी वृद्धापकाळी येणाऱ्या बहिरेपणावर उपचार करण्यासाठी आवश्ययक असणाऱ्या, भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाला तब्बल आठ लाख ६६ हजार ९०२ अमेरिकन डॉलरचा निधी घोषित करण्यात आला आहे.
खलिल रझाक असं या संशोधकाचं नाव असून ते मूळचे चेन्नईचे आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठात ते मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स या विषयांचे सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांना राष्ट्रीय विज्ञान प्रतिष्ठानकडून फॅकल्टी करिअर डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत हा निधी देण्यात येणार आहे.
वयानुसार येणारं बहिरेपणा टाळता येण्यासारखा असून, लोकांना ध्वनिलहरींतील बदल सहजगत्या टिपता न आल्यामुळं अडचणींचा सामना करावा लागतो, असं रझाक म्हणाले. वयानुसार मेंदूतील होणाऱ्या बदलांमुळं ध्वनीमधील बदल लोक टिपू शकत नाहीत, त्यामुळं मेंदूतील ठराविक चेतापेशींचा अभ्यास करणं आवश्य क ठरतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.