रोम : वेगवेगळ्या देशांतील अजब-गजब कायदे ऐकून तुम्हाला हसू येत असेल पण, काही लागू करण्यात आलेले हास्यास्पद किंवा आश्चर्यजनक कायदे खरोखरच त्या त्या भागांतील नागरिकांना पाळावे लागतात... असाच एक अजब कायदा इटलीच्या एका गावात लागू करण्यात आलाय.
इटलीच्या विलिया गावातील मेयर जिकीनेला यांनी हा गजब कायदा बनवलाय... आणि आपलं हस्ताक्षरही केलंय. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, या गावातील नागरिक आजारी पडू शकत नाहीत... आणि जर का असं झालं तर त्यांना दंडही भरावा लागेल याची तरतूद या कायद्यात करण्यात आलीय.
हा कायदा बनवण्यामागचं कारणंही मेयरनं यावेळी व्यक्त केलंय. गावाची घटती जनसंख्या रोखण्याचा या कायद्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. अशा कायद्यामुळे लोक आपल्या स्वास्थ्य सांभाळतील... आणि आपल्या आरोग्यासाठी ते गंभीर राहतील.
जे नागरिक हा कायदा पाळतील आणि आजारी पडणार नाहीत त्यांना टॅक्समध्ये सूटही देण्यात येईल, अशीही तरतूद या कायद्यात करण्यात आलीय. मेयरच्या ऑफिसननं हा आदेश आपल्या वेबसाईटवरही टाकलाय.
1951 साली या गावाची लोकसंख्या होती 1500... हीच लोकसंख्या बळावलेल्या आजारांमुळे आणि लोकांच्या हलगर्जीपणामुळे 500 वर येऊन ठेपलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.