हैदराबादचा गुलाबी हिरा २१२ कोटीला विकला!

हैदराबादच्या निजामाचा ‘प्रिन्सी’ नावाचा हिरा तीन कोटी ९० लाख डॉलर म्हणजे सुमारे २१२ कोटी रुपयांना विकला गेला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 18, 2013, 01:39 PM IST

www.24taas.com, न्यू यॉर्क
हैदराबादच्या निजामाचा ‘प्रिन्सी’ नावाचा हिरा तीन कोटी ९० लाख डॉलर म्हणजे सुमारे २१२ कोटी रुपयांना विकला गेला. कुशन कटची चमक असलेला हा सुंदर गुलाबी हिरा दक्षिण भारतात गोवळकोंडाच्या खानकडून प्राप्त झाला होता. हा हिरा कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि हैदराबादचे अंतिम निजाम मीर उस्मान खान यांच्याकडे होता.
३४ कॅरेटच्या या हिऱ्याला एका अज्ञात व्यक्तीने खरेदी केला. त्याने फोनवरून याची लिलावात बोली लावली होती. न्यू यॉर्कच्या क्रिस्टी या लिलावगृहाने सांगितले की, मूळची ब्रिटनची अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलरच्या प्रसिद्ध संग्रहाव्यतिरिक्त अमेरिकेतील सर्वात मोठा लिलाव होता. या ऐतिहासिक हिऱ्याचा लिलाव केल्याबद्दल क्रिस्टी या लिलावगृहाला अभिमान वाटत आहे.
हिऱ्याच्या लिलावात हा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. या पूर्वी डिसेंबर २००८ मध्ये ‘बिट्टल्सबॅच डायमंड’चा लिलाव २ कोटी ४३ लाख म्हणजे १.३ अब्ज इतक्या किंमतीला विकला गेला होता. प्रिन्सीचा इतिहास एका कुळाशी जोडला गेला आहे. निजाम मीर उस्मान यांना टाइम मॅगझिनने १९३७ मधील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती घोषीत केले होते. १४ वर्षीय ‘प्रिन्स ऑफ बडोदा’ च्या नावावर हिऱ्याला ‘प्रिन्सी’ नाव देण्यात आले होते.