इफ्तारआधी जेवल्यामुळे वृद्ध हिंदूला बेदम मारहाण

पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका वृद्ध हिंदूला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

Updated: Jun 12, 2016, 11:12 PM IST
इफ्तारआधी जेवल्यामुळे वृद्ध हिंदूला बेदम मारहाण title=

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका वृद्ध हिंदूला बेदम मारहाण करण्यात आली आहे. इफ्तारच्या आधी जेवल्यामुळे त्याला ही मारहाण करण्यात आली. मुख्य म्हणजे ही मारहाण एका पोलीस कॉन्स्टेबलनंच केली असल्याचं समोर आलं आहे. 

सोशल मीडियावर या मारहाणीविरोधात आवाज उठल्यानंतर पोलिसांनी या कॉन्स्टेबल आरोपीला अटक केली आहे. मारहाण झालेल्या या वृद्ध व्यक्तीचं नाव गोकलदास असं आहे. मारहाण झाल्यानंतरचा गोकलदास यांचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता. या फोटमध्ये त्यांच्या हातावर रक्ताचे डाग दिसत आहेत. 

पाकिस्तानच्या घोटकी जिल्ह्यामधला कॉन्स्टेबल अली हसननं ही मारहाण केली असल्याची माहिती पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननं दिली आहे.