www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पृथ्वीचं स्वरुप, तिचा आकार हा नेहमीच अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरलाय. नुकतंच नासानं अवकाशातून टिपलेले पृथ्वी आणि चंद्राचे काही छायाचित्र प्रसिद्ध केलेत.
ही छायाचित्र १९ जुलै रोजी घेण्यात आली आहेत. नासानं ही छायाचित्र घेण्यासाठी ‘कॅसिनी स्पेसक्राफ्ट’ची मदत घेतलीय. यामध्ये पृथ्वीची छायाचित्र दीड अब्ज किलोमीटर अंतरावरून घेतली आहेत तर चंद्राची छायाचित्र ९ करोड ८० लाख किलोमीटर अंतरावरून घेण्यात आलीत.
कॅसिनीच्या साहाय्यानं घेतल्या गेलेल्या या छायाचित्रांमध्ये पृथ्वी आणि चंद्र एका छोट्या बिंदूप्रमाणे भासत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.