भारताविरोधात अखेरच्या जिहादची वेळ आलीय- हाफिज

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं एकदा पुन्हा भारताविरुद्ध विष ओकलंय. सईदनं त्याच्या समर्थकांसमोर दिलेल्या भाषणात म्हटलं, काश्मीरला भारताच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भारताविरोधात अखेरचा जिहाद पुकारण्याची आता वेळ आलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 29, 2014, 05:12 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, इस्लामाबाद
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं एकदा पुन्हा भारताविरुद्ध विष ओकलंय. सईदनं त्याच्या समर्थकांसमोर दिलेल्या भाषणात म्हटलं, काश्मीरला भारताच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भारताविरोधात अखेरचा जिहाद पुकारण्याची आता वेळ आलीय. सईदनं समर्थकांना विचारलं की तुम्ही आपल्या कश्मीरी भावा-बहिणींना मदत करण्यास तयार आहे?
त्याच रॅलीमध्ये उपस्थित असलेले हजारो समर्थकांनी भारताविरुद्ध लढण्यास तयारी दर्शवलीय. आबपारा चौकात झालेल्या या रॅलीत जवळपास 10 हजार लोकं उपस्थित होते. बुधवारी पाकिस्तानच्या परमाणू परिक्षणाला 16 वर्ष पूर्ण झालेत. त्याचनिमित्त सईदनं तकबीर संमेलन भरवलं होतं. ज्यात तो भारताविरुद्ध बरळला.
सईदनं या रॅलीत पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी केलेल्या भारत दौऱ्यावरही टीका केली. सईद म्हणाला, “नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहून नवाज शरीफनं काश्मीरच्या जनतेचा विश्वासघात केलाय. काश्मीरची जनता तुम्हाला कधी क्षमा करणार नाही.“
सईदनं पाकिस्तान सरकारला सल्लाही दिलाय की, त्यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याचा आपला प्रयत्न थांबवावा, कारण त्याचा काही उपयोग नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.