आलियासह या भारतीय महिलांना फोर्ब्सच्या अंडर-३० मध्ये स्थान

फोर्ब्‍सने अंडर ३१ आशियाची लिस्‍ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये अनेक महिलांना स्थान मिळालं आहे. भारतीय अभिनेत्री आलिया भट्टसा टॉप सेलिब्रिटीजच्या लिस्‍टमध्ये स्‍थान मिळालं आहे.

Updated: Apr 13, 2017, 04:36 PM IST
आलियासह या भारतीय महिलांना फोर्ब्सच्या अंडर-३० मध्ये स्थान title=

मुंबई : फोर्ब्‍सने अंडर ३१ आशियाची लिस्‍ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये अनेक महिलांना स्थान मिळालं आहे. भारतीय अभिनेत्री आलिया भट्टसा टॉप सेलिब्रिटीजच्या लिस्‍टमध्ये स्‍थान मिळालं आहे.

पाइनर वुमेनची देखील एक लिस्ट घोषित करण्यात आली आहे ज्यामध्ये भारताच्या क्रिस्‍टीन कगेत्‍सु, दीपा कर्माकर, साक्षी मलिक, रिचा सिंह, लीजा वोन रेबेनाऊ यांचा समावेश आहे. 

फोर्ब्‍सच्या अंडर ३० लिस्‍टमध्ये ज्या महिलांना पाइनर वुमेन लिस्‍टमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे त्यामध्ये मालदिवची सफाथ अहमद जहीर, हाँगकाँ‍गची चान यूएनतिंग, दक्षिण कोरियाटी चो सोदाम, दक्षिण कारियाची चोई मिसुन, सिंगापूरचा ग्रुप फ्रीडम कप्‍स (जोएने परनजो‍थी, रेबेका परनजोथी, वेनेसा परनजोथी), चीनची फू युआनहुई, थाईलंडची अरिया जुतानूगर्न, भारताची क्रिस्‍टीन कगेत्‍सु, भारताची दीपा कर्माकर, बांग्‍लादेशची शौगत नाजबीन खान, दक्षिण कोरियाची किम हुन जुंग, ऑस्‍ट्रेलियाची विकी ले, दक्षिण कोरियाची ली जिसू, चीनची लियू वेन, भारताची साक्षी मलिक, मलयेशियाची नीलोफा, म्‍यांमारची सँडी सीन थीन, भारताची तृशा शेट्टी, भारताची रिचा सिंह, अफगानिस्‍तानची पेराडाइज सौरोरी, वियतनामची सुबोल, जपानची मारिया सुरुओका आणि भारताची लीजा वोन रेबेनाऊ यांचा समावेश आहे.