www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंग/कुआलालम्पुर
२३९ प्रवाशांना घेवून बिजिंगला जात असलेलं मलेशिया एअरलाईन्सच्या विमानाला मोठा अपघात घडलाय. या अपघातात विमानातील सर्व २३९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. यात ५ भारतीयांचाही समावेश आहे.
मलेशिया एअरलाइन्सचं विमान अचानक बेपत्ता झालं होतं. या विमानाची माहिती रडारावरून मिळत नसल्यानं अपघाताची भिती व्यक्त होत होती. या विमानात २३९ प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. या विमानाच शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. २०० कर्मचारी मदतकार्य करीत आहेत.
या विमानात पाच भारतीय नागरिक असल्याचंही आता सांगण्यात आलंय. या आधी जाहीर करण्यात आलेल्या यादीत भारतीय नागरिक असल्याची माहिती नव्हती. अजूनपर्यंत या विमानाच्या मलब्याबाबत माबिती मिळालीय की नाही याबाबत माहिती नाही.
विमानात भारतीयांसह १४ देशातील नागरिक होते. त्यात सर्वाधिक चीनच्या नागरिकांचा समावेश होता. १५२ चीन, ३८ मलेशिया, ५ भारतीय, ७ इंडोनेशिया, ६ ऑस्ट्रेलिया, ३ फ्रान्स आणि एका नवजात अर्भकासह ४ अमेरिकेतील नागरिकांचा समावेश होता. तर २ न्यूझीलंड, २ युक्रेन, २ कॅनडाचे आणि रुस, इटली, तायवान, नेदरलँड आणि ऑस्ट्रियातील १-१ नागरिकांचाही समावेश आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.