७ दिवसात बुजवला भला मोठा १०० फूटी खड्डा

आपल्याकडे खड्डा म्हटला की खोप मोठा विषय बनतो. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हाच मुळात चर्चेचा विषय ठरतो. पालिका अधिकारी आणि कॉन्ट्रॅकदारांकडून छोटे-छोटे खड्डे देखील सहज बुजवले जात नाही. पण जपानचा इंजिनिअर्सकडून याबाबत शिकण्याची गरज आहे.

Updated: Nov 15, 2016, 11:26 PM IST
७ दिवसात बुजवला भला मोठा १०० फूटी खड्डा title=

मुंबई : आपल्याकडे खड्डा म्हटला की खोप मोठा विषय बनतो. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हाच मुळात चर्चेचा विषय ठरतो. पालिका अधिकारी आणि कॉन्ट्रॅकदारांकडून छोटे-छोटे खड्डे देखील सहज बुजवले जात नाही. पण जपानचा इंजिनिअर्सकडून याबाबत शिकण्याची गरज आहे.

पाहा व्हिडिओ बातमीच्या शेवटी

जपानमधल्या फूकुओका शहरात एका रस्त्यात १०० फूट खड्डा पडला आणि आर्श्चयाची गोष्ट म्हणजे तो खड्डा ७ दिवसांत बुजवण्यात आला आणि पुन्हा वाहतूक सुरु झाली. कामगारांनी २४ तास दिवस रात्र मेहनत करत तो खड्डा बुजवला. रस्त्याखालून जाणा-या गॅस, पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान झाले ते दुरुस्त करत हा खड्डा बुजवला गेला. जपानी लोकं हे त्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ओळखले जातात. त्यांनी याचं एक पुन्हा अदभूत दर्शन घडवलं आहे.