www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
`माइट` नावाच्या किड्याने जगात सगळ्यात जोरात धावण्याचा रेकॉर्ड केला आहे. हा किडा चित्त्यापेक्षाही जास्त वेगाने धावतो. याचा आकार तिळी एवढाच असतो. काही किड्यांची मात्र थोडी मोठ्या प्रमाणात वाढ होते.
`पाराटारसोटोमस मॅकरोपलपिस` नावाच्या या जीवाची धावण्याची क्षमता ताशी २ हजार ०९२ किमी इतकी असते. सगळ्यात जोरात धावणाऱ्या प्राण्यांमध्ये या आधी `टायगर बीटल`चा रेकॉर्ड होता, जो १७१ बॉडी लेंथ प्रती सेकंदच्या स्पिडने पळत असे. `माइट`चा स्पिड शोधण्यासाठी शोधकर्त्यांनी हायस्पीड कॅमेराचा वापर केला.
एखाद्या दिवशीच दिसणारा हा किडा पक्ष्यांच्या नजरेत आल्यास, त्याला खाण्यात येते. या किड्याचा रंग लाल भडक असतो. तसेच या किड्याच्या अंगावर चिकट द्रव असतो. पावसाळ्याच्या सुरूवातीस या किड्याचे दर्शन सहज होते. पण नंतर मात्र हा किडा गायब होतो.
स्पायडरप्रमाणे जरी हा किडा दिसत असला, तरी हा स्पायडर नाही. `माइट`ला हातावर घेतल्यास तो चावतही नाही. एक सेंटीमीटर लांबीचा हा किडा जमिनीवर, लाल भडक आणि तितक्याच आकर्षक रंगामुळे सहज आढळतो. भारतात काही ठिकाणी राणी किडा म्हणूनही या किड्याला ओळखतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.