www.24taas.com झी मीडिया, वॉशिंग्टन
इजिप्तचे पदच्यूत अध्यक्ष मोहंमद मोर्सीसमर्थंकांवरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हिंसक कारवाईचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी निषेध केलाय.
या घटनेनंतर अरब देशांसोबत होणा-या अमेरिकी सैन्याचे सराव अभियान अमेरिका रद्द करत आहेत अशी घोषणा बराक ओबामा यांनी केलीये. मोहंमद मोर्सी यांच्या समर्थकांच्या दोन छावण्यांवर सुरक्षा दलांनी केलेल्या हल्लयात ६२३ जणांचा मृत्यू झालाय.
पूर्व कैरोतील रब्बा अल्- अदाविया कँप आणि मध्यवर्ती भागातील अल्-नाहदा चौक येथील मोर्सी समर्थकांच्या छावण्यांना पोलिसांनी वेढा दिला. त्यावेळी नागरिक आणि पोलिसांत झालेल्या संघर्षात ६२३ जणांचा मृत्यू झाला.
इजिप्तची वाटचाल अराजकतेकडे दिसून येत आहे. या देशात हिंसाचार उफाळून आला आहे. आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्यात येत आहे. लष्करी कारवाईत तब्बल ६२३ ठार झाल्याचे वृत्त आहे. पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहंमद मोर्सी सर्मथक निदर्शकांना हटविण्यासाठी लष्कराने कारवाई केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.