www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
बाजारात जाताना एकट्या दुकट्या बाहेर पडलात तर तुम्हाला अटक होऊ शकतो... होय, महिलांना पुरुषांशिवाय एकट्याने बाहेर पडण्यास प्रतिबंध घातला गेलाय.
पुरुषांशिवाय बाजारात जाऊ नये अशी घोषणा उत्तर-पश्चिम पाकिस्तानात करण्यात आलीय. हा निर्बंध रमजान महिन्यासाठी घालण्यात आलाय. या महिन्यात पुरुषांचे लक्ष विचलित होऊ नये, यासाठी हा निर्बंध घातला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.
पाकिस्तानातील पख्तुनख्वा शहरातील कराक या जिल्ह्यात एका मस्जिदमध्ये ही घोषणा करण्यात आलीय. या घोषणेनुसार एकटी महिला खरेदीसाठी बाहेर पडली तर तिला अटक होऊ शकते. तसेच सामान विकणाऱ्या दुकानदारालाही सामान दिल्याबाबत शिक्षा होऊ शकते, अशी सूचना जिल्हा पोलिस अधिकारी फजल हनीफ यांनी दिलीय.
सगळ्यात मह्त्त्वाची गोष्ट अशी की या घोषणेचे समर्थन पोलिसांकडूनच होतंय.
रमजानच्या महिन्यात दिवसभर रोजा पाळला जातो. यादरम्यान पुरुषांचे लक्ष विचलित होऊ नये या हेतूनं महिलांवर हा निर्बंध घातला गेलाय. दुकांनदारानी मात्र या निर्बंधाला विरोध केलाय. 'या निर्णयामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होऊ शकतो' असं त्यांनी म्हटलंय. काही कुटुंबांनीही या निर्णयाला नापंसती दर्शवलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.