मातेच्या पोटातील गर्भावर सैतानाची वाईट नजर, फोटो वायरल

एका महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या अर्भकावर नजर ठेवणारी आकृती अल्ट्रासाऊंडमध्ये दिसलाय. या बातमीवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, असं घडल्याचं सोशल मीडियातून सांगितलं जातंय. 

Updated: Jan 8, 2016, 04:07 PM IST
मातेच्या पोटातील गर्भावर सैतानाची वाईट नजर, फोटो वायरल title=

मुंबई : एका महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या अर्भकावर नजर ठेवणारी आकृती अल्ट्रासाऊंडमध्ये दिसलाय. या बातमीवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, असं घडल्याचं सोशल मीडियातून सांगितलं जातंय. 

डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो महिलेच्या एका मित्रानं सोशल मीडियावर शेअर केलाय. अल्ट्रासाऊंडमध्ये महिलेच्या पोटात  अर्भकाच्या आकृतीसोबत एक वेगळी आकृतीही दिसतेय. 

creepiest ultrasound 3
या फोटोतही दिसतेय आकृती

हा फोटो सोशल वेबसाईटवर चांगलाच वायरल होताना दिसतोय. आत्तापर्यंत हा फोटो जवळपास २५ लाख लोकांनी पाहिलाय. इतकंच नाही तर या फोटोवर अनेकांनी आपली प्रतिक्रियाही व्यक्त केलीय. 

काही लोकांच्या मते ही आकृती मातेच्या पोटात अर्भकाची सुरक्षा करतेय... तर काहींना हा अर्भकावर वाईट नजर ठेवणारा सैतान वाटतोय.