क्युबा : क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. ते नव्वद वर्षांचे होते.
13 ऑग्स्ट 1926 ला त्यांचा जन्म झाला. गेल्या काही वर्षांपासून ते आजारीच होते. त्यामुळे सार्वजनिक जीवनापासून ते लांबच होते. 1959 ते 1976 अशी सुमारे 30 वर्ष त्यांनी क्युबाचे राषअट्राध्यक्षपद भूषवले आहे. 2008 साली त्यांचे बंधू राऊल यांनी क्युबाचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले.कॅस्ट्रो यांनी हवाना विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. ते डाव्या विचारसरणीचे होते. त्यांनी सरकारविरोधात बंड पुकारून सरकारचा पाडाव केला. त्यानंतर आपली सत्ता एकहाती केंद्रीत केली.
कॅस्ट्रो यांनी 1959 ते 1976 या काळात क्युबाचे पंतप्रधानपद तर 1976 ते 2008 या काळात क्युबाचे राष्ट्राध्यक्षपद भूषविले. क्युबात कम्युनिस्ट राजवटीचा एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यात फिडेल कॅस्ट्रो यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 1959मध्ये गव्हेरा यांच्या साथीने कॅस्ट्रो यांनी क्युबातील बॅतिस्ता यांची अमेरिकाधार्जिणी राजवट उलथून टाकली. त्यानंतर फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष बनले. केस्ट्रो यांनी अमेरिकेच्या नावावर टिच्चून कम्युनिस्ट सत्ता राबवली. त्यांनी तिसऱ्या महायुद्धाला जवजवळ तोंडफोडले होते.
तब्बल अर्धशतकाहून अधिक काळ कॅस्ट्रो यांनी क्युबावर अधिराज्य गाजवले. 2008मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव आपले लहान भाऊ राउल कॅस्ट्रो यांच्याकडे त्यांनी क्युबाची धुरा सोपवली होती. शुक्रवारी रात्री १०.२९ वाजता निधन झाल्याचे क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांकडून जाहीर करण्यात आले.