आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारला

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १०२ डॉलरपर्यंत पोहोचलाय. इजिप्तमधून तेलाचा घटलेला पुरवठा आणि अमेरिकेतली वाढलेली तेलाची मागणी याचा परिणाम तेलाच्या दरांवर झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 4, 2013, 11:41 AM IST

www.24taas.com, झीमीडिया, नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १०२ डॉलरपर्यंत पोहोचलाय. इजिप्तमधून तेलाचा घटलेला पुरवठा आणि अमेरिकेतली वाढलेली तेलाची मागणी याचा परिणाम तेलाच्या दरांवर झालाय.
भारतातल्या पेट्रोल तसंच डिझेलच्या दरांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातले तेलाचे भाव तसंच सतत पडणारा रुपया याचा परिणाम म्हणून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थितीचे विश्लेषक अच्युत गोडबोले यांच्याकडून
दरम्यान, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांनी अखेरीस लष्करानं पदच्युत केलंय. जनक्षोभावर तोडगा काढण्याची ४८ तासांची मुदत संपताच लष्कर प्रमुख जनरल अब्लेद फत्ताह अल-सिसी यांनी व्हिडिओ संदेशात मोर्सींकडून सत्ता काढून घेत असल्याचं जाहीर केलं. त्यावर कैरोच्या तहरीर चौकासह देशभर पसरलेल्या आंदोलकांनी एकच जल्लोष केला.

मोर्सी यांच्या जागी घटना न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची नेमणूक करण्यात आलीये. तसंच लवकरात लवकर पुन्हा निवडणूका घेऊन लोकशाही सरकार अस्तित्वात आणलं जाईल, असं आश्वासनही इजिप्तच्या लष्करानं दिलंय. या घडामोडींचाही तेल
*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.