www.24taas.com,झी मीडिया, ढाका
बांगलादेशाची कट्टरपंथी संघटना जमाक ए इस्लामीचे मुख्य नेता गुलाम आजम यांना सोमवारी कोर्टाने ९० वर्षांची शिक्षा ठोठावलीय. ते ९१ वर्षांचे आहेत. तेथील खास आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणने १९७१ला झालेल्या स्वतंत्रतेच्या युद्धाच्यावेळी अनेक अपरांधांसाठी त्यांना मास्टरमाइंड ठरवण्यात आलंय.
आजम यांचा निर्णय ऐकण्यासाठी सामान्य जनता फारच उतावीळ होती. आजम यांना खून, टॉर्चरशी संबधित अशा ६१ गुन्ह्यांसाठी त्यांना दोषी ठरवण्यात आलंय. आजम याच्या पक्षाने १९७१ला झालेल्या बांगलादेश मुक्तिसंग्रामला विरोध केला होता.
`आजम यांना केलेल्या अपराधांसाठी मृत्यूदंड मिळायला हवा. परंतु त्यांचे वय आणि त्यांची शारिरिक स्थिती पाहता त्यांना ९० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.` अशी माहिती न्यायाधीशांनी दिलीय. निर्णयाची सुनावणी होताना आजम स्वत:ही उपस्थित होते. यानिर्णयाला विरोध करण्यासाठी आजम यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी राष्ट्रव्यापी संप केलाय. आजम याच्या समर्थकांनी ढाका आणि बाकी शहरात दिवसभर प्रदर्शने केली.
न्यायाधीश कबीर यांनी ७५ पानी निर्णय सांगताना असे म्हटले की, गुलाम आजम यांची केस फारच अनोखी आहे. या अपराधांच्या दरम्यान त्यांची तिथे वैयक्तिक उपस्थिती नव्हती. परंतु १९७१ च्या युद्धदरम्यान केलेल्या अपराधांसाठी ते आरोपी आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.