काळ्या धंद्यातून जमा केलेली छोटा राजनची डोळे दीपवणारी संपत्ती

रविवारी इंडोनेशियात तावडीत सापडलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजनबद्दल अनेक खुलासे समोर येत आहेत. त्यातच छोटा राजनच्या संपत्तीबद्दलही माहिती समोर आलीय. जगभरात छोटा राजननं जवळपास चार हजार करोडहून अधिक संपत्ती जमा केलीय.

Updated: Oct 30, 2015, 09:12 AM IST
काळ्या धंद्यातून जमा केलेली छोटा राजनची डोळे दीपवणारी संपत्ती title=

नवी दिल्ली : रविवारी इंडोनेशियात तावडीत सापडलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजनबद्दल अनेक खुलासे समोर येत आहेत. त्यातच छोटा राजनच्या संपत्तीबद्दलही माहिती समोर आलीय. जगभरात छोटा राजननं जवळपास चार हजार करोडहून अधिक संपत्ती जमा केलीय.

मीडिया रिपोर्टसनुसार, छोटा राजनचं चीनमध्ये एक हॉटेल आहे. सिंगापूर आणि थायलंडमध्ये त्याचे ज्वेलरीचं दुकान आहे. याशिवाय इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एक हॉटेल आहे. 

आणखी वाचा - छोटा राजनच्या आयुष्यात 'ती' विदेशी कोण?

तसंच त्यानं आफ्रिकन देशांमध्ये हिऱ्यांच्या व्यापारातही मोठी गुंतवणूक केलीय. खास करून झिम्बॉम्ब्वेमध्ये छोटा राजननं मोठी गुंतवणूक केलीय. 

अधिक वाचा - मी सरेंडर केलं नाही, भारतात परतायचंय- छोटा राजन

मिळालेल्या माहितीनुसार, राजननं काही अधिकाऱ्यांच्या मदतीनं झिम्बॉम्ब्वेमध्ये शरण घेण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु, झिम्बॉम्ब्वेनं त्याला नकार दिला. 

आणखी वाचा - जाणून घ्या कशी झाली छोटा राजनला अटक

दुसरीकडे, क्राईम ब्रांचनं आत्तापर्यंत राजनविरुद्ध जवळपास 75 प्रकरणांची माहिती मिळवलीय. यातील अधिक केस मकोका अंतर्गत दाखल करण्यात आलेत. राजनविरुद्ध अनेक प्रकरणं 1990 च्या दशकात दाखल झालेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.