www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
तुम्ही बाहेर जाण्यासाठी तयार आहात... तुमची स्कुटर तयार आहे... पण, तुमच्याकडे भली मोठी सुटकेस आहे... मग काय करणार? या प्रश्नानं तुम्हाला कधी सतावलं असेल तर त्यावर आता नक्कीच एक उपाय आहे.
मध्य चीनमध्य राहणाऱ्या लियांगसाईनं या प्रश्नावर ‘सुटकेस स्कूटर’ तयार करून उत्तर शोधून काढलंय. लियांगसाई या तरुणानं बॅटरीवर चालणारी ही स्कूटर तयार केलीय... सुटकेससारख्या दिसणाऱ्या या स्कूटरवर बसून तुम्ही कुठेही जाऊ शकता.
मीडिया रिपोर्टनुसार, लियांगसाई यानं आपल्या या अनोख्या स्कूटरचं प्रदर्शन चांग्शा स्टेसनपासून आपल्या घरापर्यंत म्हणजेच जवळजवळ 12 किलोमीटर प्रवास करून केलं. ही स्कूटर बनवायला त्यानं तब्बल 10 वर्ष मेहनत घेतलीय. लियांगसाईनं याचं पेटंटही आपल्या नावावर नोंदवलंय.
लियांगसाईनं याआधी कार सेफ्टी सिस्टमचा शोध लावला होता. या शोधासाठी त्याला 1999 साली अमेरिकेकडून पुरस्कारही प्राप्त झालाय. हाच पुरस्कार घेण्यासाठी तो जेव्हा अमेरिकेत गेला होता. तेव्हा त्याची सुटकेस चोरील गेली... आणि लगेचच ही आईयाची कल्पना त्याच्या डोक्यात आली.
लियांगसाईनं बनवलेल्या या सुटकेस स्कुटरची खासियत म्हणजे तुमच्या लगेजच्या मध्ये उभं राहून चालक हॅन्डल पकडू शकतो आणि ब्रेक, गिअर आणि लाईटस् हाताळू शकतो. जीपीएस सिस्टम वापरून 7 किलो वजनाच्या या सुटकेस स्कूटरवर दोन जण प्रवास करू शकतात. ही स्कूटर 20 किलोमीटर प्रति तास वेगाने चालते. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर यावरून 50-60 किलोमीटरपर्यंत प्रवास केला जाऊ शकतो.... आणि ही सुटकेस स्कूटर चोरी होण्याचा प्रश्नच नाही कारण यामध्ये एक अलार्मचीही सोय केली गेलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.