www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसंख्याविषयक कडक धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या चीननं `हम दो हमारे दो` हा नवा नारा दिलाय. आपल्या एक अपत्य धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
सध्या होत असलेली लोकसंख्येतली असंतुलित वाढ आणि युवाशक्तीची कमी संख्या या भीतीमुळं चीननं चार दशकांपासून सुरु असलेलं एक अपत्य हे धोरण बदलण्याचा निर्णय घेतलाय. वाढत्या लोकसंख्येला लगाम घालण्यासाठी १९७० साली चीननं एक अपत्य धोरण सुरु केलं होतं. मात्र त्याचे चांगले परिणाम होण्याऐवजी दुष्परिणाम चीनला जाणवू लागले. लोकसंख्येत असमतोल, स्त्री-पुरुष संख्येतील असमतोलाचे दुष्परिणाम समोर येऊ लागले. त्यामुळं आता चीननं हा नवा निर्णय घेतलाय.
या नव्या धोरणानुसार दामपत्याला एकमेव अपत्य असेल तर त्याला दोन अपत्य होऊ देण्याची सरकारी परवानगी मिळालीय. २०२०पर्यंत भारत जगातला युवा देश म्हणून नावारुपाला येण्याची शक्यता वर्तवलीय. तसं होऊ नये म्हणून भारताला रोखण्यासाठी चीननं हा बदल केल्याचं बोललं जातंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.