www.24taas.com, झी मीडिया, कैरो
इजिप्तची वाटचाल अराजकतेकडे दिसून येत आहे. या देशात हिंसाचार उफाळून आला आहे. आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्यात येत आहे. लष्करी कारवाईत तब्बल ६२३ ठार झाल्याचे वृत्त आहे. पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहंमद मोर्सी सर्मथक निदर्शकांना हटविण्यासाठी लष्कराने कारवाई केली आहे.
लष्कराने केलेल्या कारवाईत आतापर्य़ंत शेकडो निदर्शक ठार झाल्यानंतर आता मुस्लीम ब्रदरहूडने या अराजकतेविरोधात शांततापूर्ण निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. मुस्लीम ब्रदरहूडने हे हत्याकांड थांबविण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. लष्करांकडून बळाचा वापर करताना आंदोलन कर्त्यांवर गोळीबार केला जात आहे.
आमच्यावर लष्करी अत्याचार होत आहे, असा आरोप आंदोलनकर्त्या नागरिकांनी केलाय. आम्ही शांततेच्या मार्गाने हाणून पाडू, असे मुस्लीम ब्रदरहूडचे प्रवक्ते गेहाद इल हद्दाद यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. मोहम्मद मोर्सी सर्मथकांची निदर्शने मोडून काढताना सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत६२३ ठार तर साडेतीन लाखांपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
इजिप्तमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. हिंसाचारानंतर आणीबाणी लागू केल्याने कैरो आणि अन्य शहरांत आता शांतता आहे. लष्कराने ३ जुलै रोजी पदच्युत केलेल्या मोर्सी यांना पुन्हा सत्तारूढ करण्याच्या मागणीसाठी मोर्सी सर्मथकांनी सहा आठवड्यांपासून राबा-अल-अदाविया मशीद व नाहदा चौकात ठिय्या मारला होता. मोर्सी यांच्या सर्मथकांवर अश्रुधुरांच्या नळकांड्यांसह बंदुकीच्या फैरीही झाडल्याचे सांगण्यात येते. मृतांमध्ये ४३ पोलीस अधिकार्यांफचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.