फेसबुकने केलं मुलांना हुशार

फेसबुकमुळे मुलं हुशार होत असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.

Updated: May 1, 2014, 08:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमेरीका
फेसबुकमुळे मुलं हुशार होत असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. अमेरिकेत बेलर युनिव्हर्सिटीने यासंबंधी संशोधन केले आहे. फेसबुकमुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची वृत्ती वाढते. तसेच अनेक गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना माहिती मिळत राहते. या कारणाने मुले हुशार होतात, असा निष्कर्ष संशोधनात काढण्यात आला आहे.
फेसबुकमुळे कसा परीणाम होतो हे पाहण्यासाठी समाजशास्त्र विषयासाठी प्रवेश घेणाऱ्या २१८ विद्यार्थ्यांची चाचपणी करण्यात आली. यात असे दिसून आले की, विद्यार्थी हे प्रश्न उत्तरात पुढे आहेत. तसेच त्यांची उत्तरपत्रिकेतील उत्तर चांगली होती. त्यांच्या उत्तरपत्रिका अधिक सखोल होत्या आणि फेसबुकवर केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या विद्यार्थीमित्रांपेक्षा ते सामाजिकदृष्ट्या सजग होते. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना एकमेकांनी फेसबुकवर शेअर केलेल्या या माहितीचा उत्तम उपयोग झाला. तसेच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेगळी तयारी पण करावी लागली नाही.
या ग्रुपमधील प्रवेश सक्तीचा नव्हता आणि एकूण विद्यार्थ्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ग्रुपमध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर या ग्रुप्समध्ये काही सामाजिक प्रश्न मांडून चर्चेला आमंत्रण देण्यात आले. या प्रश्नांशी संबंधित माहितीच्या ऑनलाइन लिंक, फोटो, व्हिडिओ आणि व्याख्याने या ग्रुपमध्ये अपलोड करण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्याला सापडलेली माहिती, फोटो, व्हिडिओ इत्यादी ग्रुपमध्ये शेअर केले.
या संशोधनाचा रिपोर्ट अमेरिकन सोशोलॉजिकल असोसिएशनच्या `टीचिंग सोशोलॉजी` या नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.