बोस्टन बॉम्बस्फोट: संशयिताला मृत्यूदंडाची शिक्षा?

बोस्टन बॉम्बस्फोटाचा संशयित आरोपी जोखर सरनाएवला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकीत घातपात करण्यासाठी हे बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप त्यावर लावण्यात आला आहे.

Updated: Apr 23, 2013, 12:58 PM IST

www.24taas.com, बोस्टन
बोस्टन बॉम्बस्फोटाचा संशयित आरोपी जोखर सरनाएवला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकीत घातपात करण्यासाठी हे बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय.
व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जे कार्नींच्या माहितीनुसार, ‘सरनाएव शत्रूंचा हेर नसल्यामुळे आम्ही त्याच्याविरूद्ध वर्तमान कायद्यानुसार कारवाई करू. तो अमेरिकी नागरीक असल्याने त्याच्यावर सैन्याच्या कायद्यांनुसार कारवाई करणे चुकीचे ठरेल.’

या हाय प्रोफाईल खटल्याची जबाबदारी दोन अटॅर्नींवर सोपवण्यात आली आहे. यातील एक अटॅर्नी भारतीय वंशाचे नागरीक आहेत. जॉन्स हॉकिंस कॉलेजचे पदवीधर आणि एमोरा लॉ कॉलेजचे विद्यार्थी आलोक चक्रवर्ती मेसाचुसेटस या जिल्ह्याचे सहायक अटॉर्नी जनरल आहेत.